Type Here to Get Search Results !

मास्तरांच्या एका बँकेत कर्मचारी भरती फिक्स झाल्याची चर्चा!!

 साप्ताहिक भ्रष्टाचार न्यूज जळगाव

▪️श्री किशोर अरुण सोनवणे ✍🏻

मुख्य संपादक

📞9021977779


🛑मास्तरांच्या एका बँकेत कर्मचारी भरती फिक्स झाल्याची चर्चा!!


➡️ 89 पद परस्पर फायनल केल्याची बातमी 


▶️जिल्ह्यातील मास्तरांच्या एका मोठ्या बँकेत आपापल्या नात्यातील किंवा जवळच्या लोकांना क्लार्क व शिपाई पदावर नोकरी रेट ठरवून फिक्स केल्याची दबक्या आवाजात चर्चा शिक्षक वर्तुळात सुरु झाली आहे.

परंतु निवडून आलेल्या खादीच्या पोशाखातील नेतेमंडळींना अजून वाढीव पदे भरण्याची लालसा असल्यामुळे आणि जास्तीत जास्त पदे आपल्या वाट्याला आल्यास नफा पण कामावता येणार आहे आणि पुढील निवडणुकीत आपण निवडून येवू किंवा नाही याची काही शास्वती पण नाही.

मागील पंचवार्षिकला याच बँकेत निवडून आलेल्या लोकांनी आपल्या पोरा सोरांना नोकरीला लावून टाकलं होतं. थोडे दिवस बोंबा बोंब झाली आणि काही जेलमध्ये पण जावून आले होते. परंतु जेलची हवा खाल्ली ते ठीक आहे परंतु त्यामुळे मुलांचे भविष्य सुधारले.

त्याचप्रमाणे आता या लोकांनी वाढीव एकूण 140 जागा भरण्याची परवानगी शासनाकडे मागितल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

तरी ज्यांना माहिती नाही त्या मास्तरांनी आता जागते रहो इतकंच......

Post a Comment

0 Comments